इचलकरंजी महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण
इचलकरंजी - महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेली ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि इतर आर्थिक लाभ अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत, असा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे. अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. वैद्यकीय उपचार तसेच दैनंदिन खर्च भागवण्यासाठी सुध्दा त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी संघटनेने महानगरपालिका कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दिला आहे.