काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावरील हल्ल्याचा कोल्हापुरात निषेध
कोल्हापूर - काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना भाजपशी संबंधित तुषार दामगुडे याने बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली आहे. आज या हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यापुढं काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बाबतीत असा प्रकार घडला तर कोल्हापूरी पध्दतीने त्याला उत्तर देऊ, असा इशारा शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी दिला आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तौफिक मुल्लाणी, काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते इंद्रजीत बोंद्रे, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, नगरसेवक दुर्वास बापू कदम, अमर समर्थ विनायक फाळके, सचिन शेंडे, सचिव संजय पोवार वाईकर, परिवहन समिती सदस्य अक्षय शेळके, संपतराव पाटील, विनायक घोरपडे, वेदवंती मोहिते, रियाज सय्यद, संजय पटकारे, वैशाली महाडिक, उमेश पाडळकर, पूजा आरडे, शुभांगी साखरे, उज्वला चौगुले, श्रीधर गाडगीळ, उत्तम शेटके, योगेश हत्तलगे, अमोल ओतारी, प्रमोद बेडेकर, स्वराज भाट, नागेश नलवडे, अथर्व पटकारे, तुषार काळे, रजनीकांत सरनाईक, विद्यानंद पोळ, रोहित पाटील, बाबुराव कांबळे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनांमध्ये सहभाग घेतला.