सेवा आणि वेतन प्रश्नी गटसचिवांचे असहकार आंदोलन...

<p>सेवा आणि वेतन प्रश्नी गटसचिवांचे असहकार आंदोलन...</p>

कोल्हापूर - महाराष्ट्र राज्यातील गटसचिवांच्या सेवा अटी वेतन विषयक प्रश्नांबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे जिल्हयातील गटसचिवांनी कर्जमाफीच्या कामकाजासह अन्य कामांबाबत असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्यानुसार १६ फेब्रुवारीपासून संभाव्य कृषी कर्जमाफी संदर्भातील माहिती देणे,  संगणकीय कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. सेवा आणि वेतन प्रश्नांवर तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा विकास सहकारी संस्था गटसचिव कर्मचारी संघटनेने दिला आहे. या आंदोलनात राधानगरी तालुक्यातील गट सचिवांनी सहभाग घेतला आहे.