प्रिया पाटील कोल्हापूर शहराच्या नवीन पोलीस उपअधीक्षकपदी रुजू

कोल्हापूर: कोल्हापूर शहराचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांची बदली नागपूर ग्रामीण इथं झालीय. त्यांच्या जागी प्रिया पाटील यांची नियुक्ती करण्यात आलीय. आज त्यांनी अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला.
प्रिया पाटील यापूर्वी बृहन्मुंबई पोलीस दलात पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होत्या. याआधी त्यांनी कोल्हापूरमध्ये गृह विभागाच्या पोलीस उपअधीक्षक, तसेच करवीर विभागाच्या पोलीस उपअधीक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे त्यांना कोल्हापूरच्या परिसराची आणि कामकाजाची माहिती आहे. गेल्या अडीच वर्षांपासून कोल्हापूर शहराचे पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असलेले अजित टिके यांनी त्यांच्या कार्यकाळात शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. कार्यभार स्वीकारल्यानंतर, शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे आणि निर्भया पथक अधिक कार्यक्षम करणे, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. असं प्रिया पाटील यांनी सांगितलं.