पुरवठा कार्यालयाने सर्व्हरमधील तांत्रिक दोष दूर करावा
युथ डेव्हलपमेंट फाउंडेशनची मागणी

कोल्हापूर - रेशन कार्ड ऑनलाईनसाठी शहर पुरवठा कार्यालयाचा सर्व्हर सुरू नसल्यामुळे अडचणी येत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून सर्व्हर डाऊनची समस्या सुरु आहे. रेशन कार्ड शिवाय उत्पन्न दाखला मिळत नसल्याने अनेक योजनांपासून नागरिकांना वंचित राहावे लागतं आहे. वारंवार तक्रार करूनही समस्या सुटलेली नाही. त्यामुळे तांत्रिक दोष लवकरात लवकर दूर करण्याची मागणी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्यावतीने शहर पुरवठा अधिकारी सचिन काळे यांच्याकडे केली आहे.
यावेळी राहुल चौधरी, चंद्रकांत कांडेकरी, रतन बानदार, निवास भोसले, फिरोज शेख आदि उपस्थित होते.