...अखेर जिल्हा परिषदेतील काळी बाहुली हटवली

<p>...अखेर जिल्हा परिषदेतील काळी बाहुली हटवली</p>

कोल्हापूर - महाराष्ट्रभर अंधश्रद्धेची अनेक प्रकरणे गाजत असताना कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा असाच धक्कादायक प्रकार दोन एप्रिलला  उघडकीस आला होता. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आयुष्यभर कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या विरुद्ध लढा दिला त्यांच्याच नावाने उभारण्यात आलेल्या सभागृहाला काळी बाहुली उलटी लटकवण्यात आली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे तत्कालीन  मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना जाब विचारत ही बाहुली हटवण्याची मागणी  केली होती. यासह ज्यांनी हे कृत्य केलय त्यांच्यावर कारवाई करावी, अशी सुद्धा मागणी केली होती. याबाबतची बातमी  एस न्यूजने प्रसारित करून जिल्हा परिषदेतील  अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार उघडकीला आणला होता. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने  ही बाहुली हटवलीय. त्यामुळे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा विजय झाला आहे. दरम्यान  बाहुली जरी हटवली असली तरी ही बाहुली नेमकी कुणी  लावलीय हे उघडकीला आणून त्यांच्यावर कारवाई होणे सुद्धा तितकंच गरजेचे आहे.