कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी, आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बदल्यांची मालिका; विविध पदांवर नव्या नियुक्त्या
राज्यात अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत . त्यामध्ये कोल्हापूरातील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे - कोल्हापूरमध्ये प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली व नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी विजय राठोड यांची नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलामुळे जिल्हा प्रशासनाला नवे नेतृत्व मिळणार आहे.
दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी डॉ. राजेंद्र बारूड यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शहर प्रशासनात या बदलामुळे कामकाजाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
तसेच, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांची सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉ. जॅस्मिन यांची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.