कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोलचा पुरवठा पुरेसा...: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे नागरिकांना आवाहन 

कोल्हापूर – सध्या आखाती देशांच्या युद्धाचे कारण सांगू कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोलचा तुटवडा असल्याचे सांगितल जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात  पेट्रोल मिळत नसल्याची अफवा पसरली आहे. या कारणास्तव नागरिक पेट्रोल पंपावर मोठी गर्दी करत आहेत. त्यामुळे आज  जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी, “पेट्रोल संपणार ही निव्वळ अफवा आहे. जिल्ह्यात पेट्रोलचा पुरवठा पुरेसा असून नागरिकांनी विनाकारण पेट्रोल पंपावर गर्दी करू नये”,  असे आवाहन केले आहे.