करवीर पंचायत समिती सभापतीपदी साताप्पा पाटील, तर उपसभापतीपदी दिपाली पाटील यांची बिनविरोध निवड
कोल्हापूर – करवीर पंचायत समिती सभापतीपदी साताप्पा पाटील यांची तर उपसभापतीपदी दिपाली पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
करवीर पंचायत समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे साताप्पा धोंडीराम पाटील आणि उपसभापती पदासाठी भाजपच्या दिपाली संजय पाटील या दोघांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांचीबिनविरोध निवड झाली आहे. पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार स्वप्निल पवार यांनी काम पाहिले. यावेळी गटविकास अधिकारी संदीप भंडारी उपस्थित होते.