कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम यांनी पदभार स्वीकारला...

<p>कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम यांनी पदभार स्वीकारला...</p>

कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी निकम तर उपमहापौरपदी जनसुराज्यचे अक्षय जरग यांची निवड झाली आहे. आज मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीत महापौर रूपाराणी निकम यांनी महापौर कार्यालयात प्रवेश करून महापौर पदाचा कार्यभार स्वीकारला.

 यावेळी बोलताना महापौर निकम यांनी, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना पूर्णत्वास नेणार असून स्वच्छता, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण या प्रमुख प्रश्नांवर विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना त्रास देऊ नये, कामकाज पारदर्शक पद्धतीने व्हावे आणि शिस्त पाळावी, अन्यथा कोणालाही माफ केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी आजी - माजी नगरसेवक, अधिकारी, महायुतीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, नूतन महापौरांना शुभेच्छा देत शहर विकासासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.