धक्कादायक : मंत्रालयात अल्पसंख्यांक दर्जाच्या प्रमाणपत्राबाबत मोठा घोटाळा...

गुपचूप 75 शिक्षण संस्थांना दिला अल्पसंख्यांक दर्जा

<p>धक्कादायक : मंत्रालयात अल्पसंख्यांक दर्जाच्या प्रमाणपत्राबाबत मोठा घोटाळा...</p>

मुंबई – राज्याच्या मंत्रालयामध्ये 75 शिक्षण संस्थांना घाईगडबडीत अल्पसंख्यांक दर्जाचे प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा सर्व प्रकार अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात शासकीय दुखवटा असताना झाल्याने खळबळ उडाली आहे. 

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही तासांतच हे प्रमाणपत्रे देण्यास सुरुवात झाल्याचे उघड झाले आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती देण्यात आली होती. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर ही स्थगिती डावलून मंत्रालयातून गुपचूपपणे प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
पहिले प्रमाणपत्र 28 जानेवारी रोजी, अजित पवार यांच्या अपघाताच्या दिवशीच दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनी देण्यात आले. राज्यात शासकीय दुखवटा सुरू असताना मंत्रालयात ही प्रक्रिया कशी आणि कोणाच्या आदेशाने राबवली गेली, असा सवाल उपस्थित होत आहे. या अल्पसंख्यांक दर्जाच्या प्रमाणपत्रामुळे अल्पसंख्यांक शाळांना RTE कायदा लागू होत नाही, 25% गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे बंधन राहत नाही, शिक्षकांसाठी TET परीक्षा बंधनकारक नाही, शिक्षकांना पदोन्नतीमध्ये विशेष सवलत, कोट्यवधी रुपयांच्या देणग्या व अनुदान घेण्याची मुभा अशा अनेक गोष्टींची सवलत या  शिक्षण संस्थांना मिळते.