दंगल नियंत्रणासाठी गृह विभागाकडून जिल्हा पोलिस दलास सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन सुपूर्द... 

सीसीटीव्ही व्हॅनचे उद्घाटन...

<p>दंगल नियंत्रणासाठी गृह विभागाकडून जिल्हा पोलिस दलास सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन सुपूर्द... </p>

कोल्हापूर - पोलिस दलाचे अत्याधुनिकरण करण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात मदत व्हावी, यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्याअंतर्गत राज्याच्या गृह विभागामार्फत सर्व जिल्ह्यांना ३६० सीसीटीव्ही सर्व्हिलन्स  व्हॅन दिल्या आहेत. यातील एक व्हॅन कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाला प्राप्त झाली आहे. याचे उद्घाटन अपर पोलिस महासंचालक दीपक पांड्ये आणि विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले.

 या व्हॅनमध्ये चारही बाजूला चार सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यात ४८ तासांचे चित्रीकरण साठवून ठेवण्याची क्षमता आहे. याचे थेट प्रक्षेपण पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्ष आणि पोलिस अधीक्षकांच्या मोबाईलवर पाहता येते. चित्रीकरणासह दंगल काबू करणं, गर्दीवर नियंत्रण ठेवणं, आणि जमावाला सूचना देण्यासाठी या व्हॅनचा उपयोग होणार आहे. याविषयी अधिक माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.

येणा-या काळात प्रत्येक पोलिस ठाण्याला एक व्हॅन देण्याचा विचार सुरू असल्याचे अपर पोलिस महासंचालक पांड्ये यांनी सांगितले. यावेळी पोलिस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी रक्षिता यादव, अपर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उपअधीक्षक गृह तानाजी सावंत, पोलिस निरीक्षक सूरजसिंह रजपूत, गजेंद्र लोहार आदी उपस्थित होते.