वर्षानुवर्षं एकाच जागी असलेल्या सरकारी अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची होणार बदली : सामान्य प्रशासनाचे आदेश 

<p>वर्षानुवर्षं एकाच जागी असलेल्या सरकारी अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची होणार बदली : सामान्य प्रशासनाचे आदेश </p>

मुंबई - वर्षानुवर्षं एकाच जागी असलेल्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मार्च-एप्रिलमध्ये बदली करण्यात येणार आहे, त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केले आहेत.
या बदलीच्या निर्णयाला आता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही किंवा बदली रद्दही केली जाणार नाही. असे म्हणत सामान्य प्रशासन विभागाने बदलीच्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. 
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, 2005 अधिसूचित करण्यात आला आहे. या अधिनियमातील नियम 3, 4 नुसार, सर्व विभागांतील 6 वर्षे पूर्ण झालेल्या सह सचिव, उप सचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी, लिपिक-टंकलेखक, लघुलेखक संवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबतची कार्यवाही एप्रिल-मे 2026 मध्ये करण्यात येणार असल्याचे  सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे.