जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, राधानगरी, करवीर व गगनबावडा या तालुक्यांसाठी श्रीमती याशनी नागराजन (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा) यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच शाहुवाडी, हातकणंगले, शिरोळ व पन्हाळा या तालुक्यांसाठी संतोष भोर (सह आयुक्त,भूसंपादन/करमणूक, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चंदगड, गडहिंग्लज, आजरा व भुदरगड या तालुक्यांसाठी नंदकुमार कोष्टी (सह आयुक्त,पुनर्वसन, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभाग, पुणे) यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त यांनी दिले आहेत.