मोटारीची ट्रॅक्टर-ट्रॉलीला मागून धडक... कसबा बावड्यातील दाम्पत्य जागीच ठार

<p>मोटारीची ट्रॅक्टर-ट्रॉलीला मागून धडक... कसबा बावड्यातील दाम्पत्य जागीच ठार</p>

कोल्हापूर - कसबा बावड्यातील संतोष गायकवाड आणि अॅड वंदना गायकवाड हे पती - पत्नी आज सकाळी मोटारीने मिरजहून पंढरपूरकडे जात होते. सकाळी सव्वा सातच्या सुमारास मिरज - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्हयातील शिरढोण येथे रस्त्याकडेला उभी असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला त्यांच्या मोटारीची पाठीमागून जोरात धडक बसली.

ही धडक इतकी भीषण होती की मोटारीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला होता. या अपघातात संतोष आणि त्यांची पत्नी वंदना यांचा जागीच मृत्यु झाला आहे. दाम्पत्याच्या अपघाती मृत्युमुळे कसबा बावडा परिसरात शोककळा पसरली आहे.