​लंडनमध्ये मंज म्युझिकचा भीषण अपघात; सिने अवॉर्ड्सपूर्वी भारत दौरा रद्द

<h2>​लंडनमध्ये मंज म्युझिकचा भीषण अपघात; सिने अवॉर्ड्सपूर्वी भारत दौरा रद्द</h2>

मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येतीय. मनजीत सिंह राल यांचा लंडनमधील रस्त्यावर भीषण अपघात झालाय. अपघातानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईतील Cine Awards 2026 मध्ये ते दमदार परफॉर्मन्स देणार होते. मात्र, अपघातामुळे त्यांना भारत दौरा रद्द करावा लागला. मनजीत हे प्रसिद्ध रिदम, ढोल, बेस बँडचे मुख्य गायक होते. भाऊ कुली राल आणि Surj RDB यांच्यासोबत त्यांनी बँडची स्थापना केली होती. 'स्वॅग मेरा देशी' आणि 'लाल घाघरा' या सारख्या गाण्यांमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. तसेच Snoop Dogg, T-Pain आणि Ludacris यांसारख्या आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबतही त्यांनी काम केले आहे. 2012 साली भाऊ कुली राल यांच्या निधनानंतर बँडला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर 2014 मध्ये मंज यांनी सोलो करिअरची सुरुवात केली. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत अपडेटची प्रतीक्षा आहे.