नागपुरात स्फोट... 17 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी...

<p>नागपुरात स्फोट... 17 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी...</p>

नागपूर – नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे आज सकाळच्या दरम्यान एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटात 17 जणांचा मृत्यू  झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हा स्फोट खूप भयानक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सध्या जखमींवर नागपुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने पोहोचले आहेत. सोबतच एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथकही दाखल झाले आहे. 
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.