गवा घुसला थेट शाळेत आणि...

 

अंबपमध्ये गव्याचा धुमाकूळ सीसीटीव्हीत कैद, धावपळीत दोघे जखमी

<p>गवा घुसला थेट शाळेत आणि...</p>

<p> </p>

हातकणंगले तालुक्यातील अंबप मध्ये आज सकाळी गव्यानं धुमाकूळ घातला आठच्या सुमारास गवा नागोबा मंदिर च्या दिशेनं गावात आला मराठी शाळेच्या पाठीमागून प्राथमिक विद्यामंदिर गर्ल्स हायस्कूलच्या पटांगणावर गवा आला. त्यावेळी विद्यार्थ्यांची कवायत सुरू होती. अचानक गवा आल्यानं सर्वांचीच धावपळ उडाली. विद्यार्थ्यांनी धावत वर्ग खोल्यांचा आश्रय घेतला गवा थेट कार्यालयात घुसला. यावेळी कार्यालयातील टेबल खुर्चासह संगणकाची मोडतोड झाली. धावपळीत मुख्याध्यापिका निलम चव्हाण आणि कर्मचारी दिनकर पाटील हे किरकोळ जखमी झाले. विदयार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवून शिक्षक आणि गावातील नागरिकांनी गव्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. यावेळी गवा अधिकच बिथरला .शाळेच्या दक्षिण बाजूस असलेल्या शिवाजी हिरवे यांच्या घरावर तो चढला. सुर्देवानं घरात कोणीही नसल्यानं पुढील अनर्थ टळला गव्यानं एका खासगी शाळेच्या अंगणात उडी मारली. हा गवा सैरभैर पळत सुटला अखेर तो मनपाडळे गावाच्या दिशेनं गेल्यानं सर्वानी सुटकेचा श्वास सोडला. गव्याचा हा धुमाकूळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून गावात भीतीचं वातावरण आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभाग आणि प्रशासनानं तात्काळ कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाय करावेत अशी मागणी होतीय. 

अंबप परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून गवा, बिबट्या आणि बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर असल्याचं स्पष्ट झालं होतं वन्य प्राण्यांचा वावर आता गावामध्ये वाढल्यानं नागरिकांचा जीव धोक्यात आलाय. त्यामुळं वनविभागानं ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.