ब्रेकिंग न्यूज
उद्योग

ओलमच्या ३०० केएलपीडी आसवनी प्रकल्पाचे दिमाखात उद्घाटन

एस न्यूज प्रतिनिधी 2 मिनिटे वाचन
शेअर करा
चनेहट्टी-राजगोळी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या प्रगतीला चालना; रोजगारनिर्मितीच्या संधी वाढणार

चंदगड : ओलम ग्लोबल ॲग्री कमोडिटीज इंडिया प्रा. लि. यांच्या राजगोळी खुर्द येथील नव्याने उभारण्यात आलेल्या ३०० केएलपीडी क्षमतेच्या आसवनी प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ बुधवारी चनेहट्टी-राजगोळी येथे उत्साहात पार पडला. ओलम ग्रुपचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मुथू कुमार एन. यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करून प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे बिझनेस हेड टी. कन्नन होते.

उन्नती ऊस विकास कार्यक्रमांतर्गत प्रति हेक्टर सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या २३ प्रगतशील शेतकऱ्यांना या वेळी मान्यवरांच्या हस्ते ‘ओलम गौरव शिल्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक रुक्मिणी विठ्ठल घुगरे (महागाव, ता. गडहिंग्लज), द्वितीय क्रमांक गोपाळ पिराजी बेळगावकर (बेळगुंदी, ता. जि. बेळगाव) आणि तृतीय क्रमांक अरुण जोतीबा पवार (यशवंतनगर-कार्वे, ता. चंदगड) यांनी पटकावला.

यावेळी ओलम ग्रुपचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मुथू कुमार एन. म्हणाले, “या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या उन्नतीला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारण्यात आला असून त्याचा लाभ परिसरातील विविध घटकांतील नागरिकांना होणार आहे.”

कंपनीचे कंट्री हेड संजय सचेती म्हणाले, “उन्नती ऊस विकास कार्यक्रमांतर्गत ओलमने यूपीएलसह विविध कंपन्यांना भागीदार करून परिसरातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा.”

अध्यक्षीय भाषणात बिझनेस हेड टी. कन्नन यांनी, “शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला संपूर्ण ऊस आणि मका ओलम कंपनीला पुरवून या प्रकल्पाच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे.” असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युनिट हेड राधाकृष्णन यांनी केले, तर आभार प्रदर्शन डिस्टिलरी हेड नरेंद्र रावत यांनी केले.

प्रकल्पाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे ओलमचे कंट्री हेड संजय सचेती, डेप्युटी कंट्री हेड नितीन गुप्ता, ग्लोबल फायनान्स कंट्रोलर व वरिष्ठ उपाध्यक्ष रामरत्नम, सेफ्टी ग्लोबल हेड सुमेरवंत सिंग, अथणी शुगरचे अध्यक्ष योगेश पाटील, अथणी कारखान्याचे कार्यकारी संचालक चंदन शेरगावकर, गुरुदत्त शुगर कारखान्याचे अध्यक्ष माधव घाटगे, तसेच शिव कुमार, साहित्य फोगत, कॉर्पोरेट एचआर हेड आदित्य चौधरी, कॉर्पोरेट फायनान्स हेड सुमित ग्रोवर, एचआर विभागाच्या रेणू, डिस्टिलरी हेड नरेंद्र रावत, इंजिनिअरिंग हेड राजेश, प्रोसेस हेड योगेश, केन हेड सुधीर पाटील, फायनान्स हेड सदाशिव गणी, युनिट एचआर अधिकारी सचिन पाटील, युनियन अध्यक्ष संतराम गुरव आणि सचिव रवळनाथ देवण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी तसेच ऊसतोडणी व वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top