ब्रेकिंग न्यूज
कृषी

एक सप्टेंबरपासून ऊस गाळप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार

एस न्यूज प्रतिनिधी अपडेट: 29 August 2026, 5:33 PM 1 मिनिटे वाचन
शेअर करा
sugar cane industry factory structure

कोल्हापूर – राज्यातील सर्व सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांसाठी साखर आयुक्तालयाने गाळप परवान्यासंदर्भात सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार आगामी २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामासाठी कारखान्यांनी १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गाळप परवाना मिळाल्यानंतरच कारखान्यांना प्रत्यक्ष गाळप सुरू करता येणार आहे. परवान्याशिवाय गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल,  असा इशारा साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिला. तसेच गाळप परवाना मिळवण्यासाठी संबंधित कारखान्यांनी मागील हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची शंभर टक्के रक्कम अदा केलेली असणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, केंद्र सरकारनेही यंदा १५ ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. सणासुदीच्या काळात साखरेची उपलब्धता वाढवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो आहे.

संबंधित विषय

Scroll to Top