भारताला विश्वगुरू बनवायचं असेल तर, अगोदर विश्वमित्र बनावं लागेल : डॉ. रघुनाथ माशेलकर
06 February 2024, 05:44:27 PM
Share
कोल्हापूर (विश्वास पानारी) - भारताला विश्वगुरू बनवायचं असेल तर अगोदर विश्वमित्र बनावं लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी केलं. ज्येष्ठ पत्रकार सु. रा. देशपांडे स्मृती दिनानिमित्त देशपांडे परिवाराच्यावतीने आयोजित स्मृती गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना सु रा देशपांडे स्मृती गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.