'एकनाथ शिंदेंना संपवून उद्या नवा 'उदय' पुढे येईल' - काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार
20 January 2025, 12:47:25 PM
Share
मुंबई - 'एकनाथ शिंदेंना संपवून उद्या नवा 'उदय' पुढे येईल' असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी करून भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत. 'माझ्या माहितीप्रमाणे उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार आहेत. 20 आमदार जेव्हा एकनाथ शिंदे सरकार स्थापन करताना रुसले होते, तेव्हाच हा 'उदय' होणार होता. किंबहुना तेव्हाच हा 'उदय' करण्याचं निश्चित झालं होतं. पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ सव्वालाखाची... हे महाराष्ट्रातील सगळे पक्ष फोडतील. शिंदे गटही फोडतील, अजित पवार गटही फोडतील. फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आणि राजकारण आहे', अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी भाजपवर कडाडून टीका केली.