...नाहीतर तुम्हाला जड जाईल : मनोज जरांगे – पाटील यांचा सरकारला इशारा

जालना : आमचा हक्क आम्हाला द्या नाहीतर तुम्हाला जड जाईल. आम्ही शांततेत आंदोलन करतो तोपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर काही खर नाही, असा इशारा मनोज जरांगे – पाटील यांनी सरकारला दिलाय. महाराष्ट्रात ५० टक्के मराठा आहेत. याची जाणीव सरकारनं ठेवावी, असंही त्यांनी सांगितलं. तुम्ही मराठ्यांना डिवचू नका नाहीतर मराठे शांत बसणार नाहीत. असं म्हणत, तुम्हाला निर्णय घ्यायला आजची रात्र आणि उद्याचा दिवस देतो, असा सरकारला अल्तीमेट दिलाय. अन्यथा होणाऱ्या परिणामांना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार राहणार आहेत. एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची खूप सवय आहे, अशी जरांगेनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. भाजपनं मराठा आरक्षण रंगी बेरंगी केलंय. भाजप चे नेते अमित शहा यांना खर सांगणार नाहीत. त्यांना माझा नंबर द्या. मराठ्यांना त्रास दिल्यास जशास तसं उत्तर देऊ असंही इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांकडून होतं असलेल्या आरोपालाही जोरदार प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, सरकारनं जालनातील इंटरनेट सेवा बंद केलीय.