ठाकरे गटाला कोल्हापूर जिल्ह्यात धक्का : ठाकरे गटाच्या हर्षल सुर्वेंनी दिला शहरप्रमुख पदाचा राजीनामा

ठाकरे गटाला कोल्हापूर जिल्ह्यात धक्का : ठाकरे गटाच्या हर्षल सुर्वेंनी दिला शहरप्रमुख पदाचा राजीनामा

कोल्हापूर – उध्दव ठाकरे गटाकडून दोन दिवसांपुर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील  नवीन पदाधिकार्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाप्रमुख पद रविकिरण इंगवले यांना  तर शहर प्रमुख पद हर्षल सुर्वे यांना देण्यात आले आहे. परंतु हर्षल सुर्वे हे जिल्हा प्रमुख पदासाठी इच्छुक होते पण, त्यांना शहर प्रमुख पद मिळाल्याने ते नाराज होते. अखेर या नाराजीत त्यांनी शहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला कोल्हापूर जिल्ह्यातून धक्का बसला आहे.

हर्षल सुर्वे यांनी आज जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांना राजीनाम्याचे पत्र सुपूर्द केले आहे. त्यात त्यांनी खदखद व्यक्त करत म्हटले आहे कि, “साहेब माझी जिल्हाप्रमुख पदी निवड झाली नाही, त्यामुळे मनातील खंत व्यक्त केली होती, मात्र आदित्य साहेबांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली. तीच जास्त जिव्हारी लागली, आज पर्यंत आदेश मानून काम केले होते. कधी आदेश डावलला नाही, पण आता आदित्य साहेबांचा आदेश आला, निर्णय मान्य नसेल तर, निघुन जावा, मला निर्णय मान्य नाही, साहेबांचा आदेश मानून पक्षातून निघून जात आहे. मी माझा पदाचा आणि सक्रिय सभासदत्वाचा राजीनामा देत आहे.”

या राजीनाम्याचे पत्र सुर्वे यांनी, शिवसेना सचिव विनायक राऊत शिवसेना उपनेते संजय पवार यांना व्हाट्सअपव्दारे पाठवले आहे.