...शक्तीपीठमध्ये ५० हजार कोटीचा ढपला मारत आहात : राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

...शक्तीपीठमध्ये ५० हजार कोटीचा ढपला मारत आहात : राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

कोल्हापूर – जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ मार्गाला शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध होत आहे, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, “शक्तीपीठ महामार्ग होणारच”. त्यामुळे शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. याला जिल्ह्यातील अनेक नेते मंडळींनी विरोध करून देखील राज्य सरकार मागे हटायला तयार नाही. यावर माजी खासदार राजू  शेट्टी यांनी एक फेसबुक पोस्ट करून, “देवाभाऊ तुमच्यापेक्षा गडकरी साहेब बरे” म्हणत दिवसा दरोडे टाकत आल्याचा आरोप केला आहे. 

या पोस्टमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे - बेंगलोर एक्सप्रेसच्या आठ पदरी रस्त्याचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील शक्तीपीठ महामार्गातील सहा पदरीच्या रस्त्याची आणि खर्चाची तुलना केली आहे.

राजू  शेट्टी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे कि, “देवाभाऊ तुमच्यापेक्षा गडकरी साहेब बरे, 
तुम्ही महाराष्ट्रातील जनतेवर टाकत आहात दिवसा दरोडे ! 
देवाभाऊंचा शक्तीपीठ महामार्ग (६ पदरी) 
एकुण खर्च ८६००० हजार कोटी 
एकुण किलोमीटर : ८०२ किलोमीटर 
प्रति किलोमीटर खर्च : १०७ कोटी २३ लाख. 
नितीन गडकरींचा पुणे ते बेंगलोर ग्रीनफील्ड एक्सप्रेस.(८ पदरी) 
एकुण खर्च ५० हजार कोटी 
एकुण किलोमीटर : ७०० किलोमीटर 
प्रति किलोमीटर खर्च : ७१ कोटी ४२ लाख.
आता तरी देवेंद्र फडणवीसांनी मान्य करावे कि शक्तीपीठ मध्ये आम्ही ५० हजार कोटीचा ढपला मारत आहोत 

https://www.facebook.com/share/p/1XxADw5WkH/