राजर्षी शाहू महाराजांचे विचार पुढे घेऊन जाण्याची आपली जबाबदारी : आ. सतेज पाटील

राजर्षी शाहू महाराजांचे विचार पुढे घेऊन जाण्याची आपली जबाबदारी : आ. सतेज पाटील

कोल्हापूर - सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन राज्य करण्याची भूमिका राजर्षी शाहू महाराजांनी घेतली. महाराजांचे कार्य त्यांचे विचार हे पुढे घेऊन जाणे ही आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन विधान  परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त, त्यांच्या जन्मस्थळी त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.