शक्तीपीठ महामार्गावरुन शरद पवारांचा खोचक टोला

शरद पवार म्हणाले की, शक्तीपीठ महामार्गाचा विषय मला समजून घ्यायचा आहे. कोल्हापूरच्या लोकांबरोबर मी बोलणार आहे. त्यानंतर राज्य सरकारने आम्हा लोकांना त्याची माहिती देण्याची तयारी दाखवली तर तेही समजून घेण्याचा माझा विचार आहे. देवेंद्र फडणवीसच्या धमकीमुळे आमची झोप उडाली आहे, असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला. फडणवीसांच्या याद राखा, या इशाऱ्यावर शरद पवारांनी आता आमच कसं व्हायचं? असा खोचक टोला लगावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.