सैन्य भरतीला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना सोयीसुविधा द्याव्यात - निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली

सैन्य भरतीला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना सोयीसुविधा द्याव्यात - निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली

कोल्हापूर - कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या ॲथलेटिक्स ग्राउंडवर 11 ते 22 डिसेंबर 2023 दरम्यान होणाऱ्या सैन्य भरती मेळाव्यासाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केल्या. सैन्य भरती मेळाव्याच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल आकाश मिश्रा व सैन्य भरती सहायक अधिकारी तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल (निवृत्त) राहुल माने, करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे, तहसीलदार (चिटणीस) स्वप्नील पवार, कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे सहायक आयुक्त संजय माळी, जिल्हा क्रीडा अधिकारी मनीषा पाटील, शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक शरद बनसोडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ व संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.