दहा चाकी ट्रक चोरट्यास कुरुंदवाड पोलिसांनी ट्रकसह केलं अटक

दहा चाकी ट्रक चोरट्यास कुरुंदवाड पोलिसांनी ट्रकसह केलं अटक

कुरुंदवाड - दहा चाकी ट्रक चोरून नेलेल्या चोरट्यासहित ट्रक ताब्यात घेण्यात कुरुंदवाड पोलिसांना यश आलंय. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील राजाराम दऱ्याप्पा कांबळे (वय 32, रा. इंदिरानगर सोन्याळ,ता. जत, जि.सांगली, सध्या रा.इनाम धामणी, ता.मिरज) या ट्रक चोरट्याला महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कुरुंदवाड पोलिसांना दहा चाकी ट्रक चोरून नेलेल्या चोरट्यासहित ट्रक ताब्यात घेण्यात यश आलंय. औरवाड गणेशवाडी मार्गावरील हद्दीतील पाटील पेट्रोल पंपाजवळून रात्रीच्या सुमारास MH-18 BG -5146 हा दहा चाकी ट्रक चोरीला गेला होता. याबाबत ट्रक मालक नारायण गोविंद हराळे (रा. नाशिक) यांनी पोलीस ठाण्यात ट्रक चोरीला गेल्याची फिर्याद दिली. या अनुषंगानं कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या नेतृत्वाखाली पथकानं तातडीनं तपास यंत्रणा गतिमान केली. दरम्यान, महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील गणेशवाडी हद्दीतील कातरकट्टी रोडवर संशयित आरोपी राजाराम कांबळे(वय 32, रा. इंदिरानगर सोन्याळ,ता. जत, जि.सांगली, सध्या रा.इनाम धामणी, ता.मिरज) याला पोलिसांनी ट्रकसह ताब्यात घेत चौकशी केली असता त्यानं ट्रक चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचं सहाय्यक पोलिस निरीक्षक फडणीस यांनी सांगितलं.