कोल्हापूर पोलीसांकडून जिल्ह्यातील अनेक नेत्यांना नोटीस...आंदोलनकर्ते आंदोलन स्थळी दाखल

कोल्हापूर पोलीसांकडून जिल्ह्यातील अनेक नेत्यांना नोटीस...आंदोलनकर्ते आंदोलन स्थळी दाखल

कोल्हापूर – आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात संघर्ष समितीच्या वतीने पुणे - बेंगलोर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर कोल्हापूर पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेत्यांना  नोटीस  पाठवली आहे. परंतु शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलककर्ते आक्रमक झाले असून ते आंदोलन स्थळी दाखल झाले आहे. 
जिल्ह्यात बंदी आदेश लागू असल्याने आंदोलन करता येणार नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तरीही आंदोलनकर्ते आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचे आता दिसून येत आहे. आज कृषी दिन असून या दिवशी आपल्या शेतीसाठी रस्त्यावर उतरावं लागत असल्याची शोकांतिका आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

#शक्तीपीठमहामार्गविरोध @rajushetti @satejpatil #रास्तारोकोआंदोलन