दोन भाऊ एकत्र येऊ नये, म्हणून किती प्रयत्न करणार…: आ. आदित्य ठाकरे

दोन भाऊ एकत्र येऊ नये, म्हणून किती प्रयत्न करणार…: आ. आदित्य ठाकरे

मुंबई – राज्यात त्रिभाषेला होत असलेला विरोध पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल त्रिभाषेचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या मोर्चाच्या निर्णयावर विजयाची मोहर उमटली आहे. त्यामुळे राज्यातून आनंद व्यक्त होत आहे. यावर आ. आदित्य ठाकरे यांनी, “महाराष्ट्राची शक्ती जिंकलेली आहे. दोन भाऊ एकत्र येऊ नये, म्हणून किती प्रयत्न करणार,” असा सवाल त्यांनी विचारला आहे.5 जुलैला एकजूट दिसणार होती. हिंदीच्या सक्तीसमोर आमची शक्ती मोठी दिसली, असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे.