कोल्हापुरातील डायमंड हॉस्पीटलमधील चार डॉक्टरांवर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल

कोल्हापूर – शहरातील राजेंद्रनगर परिसरात सुरेश काळे हे पत्नी पूनम सोबत राहतात. पूनम या आजारी असल्याने त्यांना नागाळा पार्क परिसरातील डायमंड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिच्यावर २७ आणि २८ जून दरम्यान दोन दिवस उपचार करण्यात आले. मात्र उपचार दरम्यान २८ जून रोजी पुनम हिचा मृत्यू झाला.
डॉक्टरांनी मुदतबाह्य औषधांचा वापर केल्याने पुनमचा मृत्यू झाल्याचा आरोप करत सुरेश काळे यांनी शाहुपुरी पोलिसात हॉस्पीटलच्या चार डॉक्टरांविरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी डॉ. विलास नाईक , डॉक्टर साईप्रसाद, डॉक्टर श्रद्धा नाईक, रविराज मायदेव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.