मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांना मूळ विभागात जाण्यासाठी अल्टिमेटम

राज्यातील महायुती सरकारमध्ये असणाऱ्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांमधील कुरबुरी अधूनमधून समोर येत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्र्यांच्या कार्यालयातील स्वीय सहायक (PA) आणि ओएसडींच्या नियुक्तीसंदर्भात घेतलेल्या कठोर भूमिकेवरुन महायुतीमध्ये (Mahayuti) काहीशी नाराजी आहेत. अशातच आता मु्ख्यमंत्री कार्यालयाकडून मंत्र्यांच्या खासगी सचिवांना त्यांच्या मूळ विभागात जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यापूर्वीच संबंधित स्वीय सहाय्यकांना हे आदेश तोंडी देण्यात आले होते. मात्र, त्याच्याकडे मंत्री आणि त्यांच्या पीए यांनी कानाडोळा केला होता. मात्र, आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांना तातडीने त्यांच्या मूळ विभागात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे महायुती सरकारच्या मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे.