सांगलीत बसच्या चाकाखाली चिरडून 21 वर्षांच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

सांगलीत बसच्या चाकाखाली चिरडून 21 वर्षांच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

राज्यातील अपघातांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल रोडवर मंगळवारी सकाळी दुचाकीवरून महाविद्यालयाकडे निघालेल्या एका विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू झाला. एसटी बसच्या मागच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. शर्वरी राजकुमार कुलकर्णी (वय 21, रा. हरिपूर) असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. या भीषण अपघातानंतर स्थानिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवर बसच्या चाकाखाली येऊन सापडून दुचाकीस्वार महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शहरातील जयमातृभूमी व्यायाम मंडळासमोर 10.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात एस्टीचे मागील चाक तरुणीच्या डोकयावरून गेल्याने शर्वरी कुलकर्णी या महाविद्यालयीन तरुणीचा  जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. 

मृत शर्वरी कुलकणी ही विद्यार्थिनी ही सांगलीतील एका महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेत होती. आज सकाळी ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असताना सिव्हिल रोडवर मुंबई जमखंडी बसला तिची दुचाकी घासली. यामध्ये मागील चाकखाली सापडून तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर काही अंतरावर जाऊन थांबली.. घटनेनंतर शर्वरी हिचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. यां घटनेने परिसरातील हळहळ व्यक्त केली जात आहे. शर्वरी हिचे वडील वारले आहे. तिची आई आणि बहिणीसोबत ती हरिपूर येथे राहत होती.