शेतकऱ्यांना कसाबपेक्षाही वाईट वागणूक, शक्तीपीठ महार्गावरुन शेट्टींचा हल्लाबोल

धाराशिवमधील (Dharashiv) शक्तीपीठ महामार्गाची (Shaktipeeth Highway) जमिन मोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. शेतकरी आंदोलनाचा धसका घेत प्रशासनाने मोजणी करण्याचा निर्णय थांबवला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti ) यांच्या बैठकीत धाराशिव प्रशासनाने मोजणी प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना कसाबपेक्षाही वाईट वागणूक दिली जात आहे. तो शत्रू राष्ट्रातून आलेला असताना, देशाचा घात करा.यला आलेला असतानाही त्याला त्याचं म्हणणं मांडायला संधी दिली, त्याला वकिल दिला, त्याला खायला बिर्याणी दिली असे शेट्टी म्हणाले. तळहाताच्या फोडाप्रमाणे पिढ्यानं पिढ्या ज्यानं शेती जपली, ती शेती काढून घेताना ना त्याला विचारलं ना त्याच्या हरकतीचा विचार केल्याचे शेट्टी म्हणाले.