पंजाबचा धावपटू गुरिंदरवीर सिंगने भारतीय ॲथलेटिक्सचा इतिहास रचला... 

राष्ट्रीय विक्रम मोडत ठरला पहिला भारतीय खेळाडू 

<p>पंजाबचा धावपटू गुरिंदरवीर सिंगने भारतीय ॲथलेटिक्सचा इतिहास रचला... </p>

नवी दिल्ली – रांचीमध्ये पार पडलेल्या भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचा स्पर्धेत पंजाबचा 25 वर्षीय धावपटू गुरिंदरवीर सिंगने पुरुषांची 100 मीटर शर्यत केवळ 10.09 सेकंदात पूर्ण करून रेकार्ड मोडला आहे.
100 मीटरची शर्यत 10.10 सेकंदांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. कमी वेळेत धावल्याने त्याने इतिहास रचला आहे. 
या स्पर्धेत पंजाबचा गुरिंदरवीर आणि ओडिशाचा अनिमेश यांच्यात लढत  रंगली होती. अनिमेश गेल्या वर्षी 10.18 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करून प्रबळ दावेदार ठरला होता. पण या वर्षी  गुरिंदरवीरने पहिल्या उपांत्य फेरीच्या हीटमध्ये आपली वेळ 10.17 सेकंदांपर्यंत कमी केली. फक्त पाच मिनिटानंतर, 22 वर्षीय अनिमेशने दुसऱ्या उपांत्य फेरीच्या हीटमध्ये 10.15 सेकंदांची वेळ नोंदवली तर  गुरिंदरवीरने 10.10  सेकंदांची वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला.