कृषी क्षेत्रात डिजीटल प्लॅट फार्मपेक्षा पायाभूत सुविधा देणे गरजेचे : राजू शेट्टी

23 July 2024, 09:08:38 PM Share
शिरोळ - केंद्र सरकारने आज जाहीर केलेला अर्थसंकल्प निराशाजनक आहे. कृषी क्षेत्रात डिजीटल प्लॅटफॅार्म करण्यापेक्षा पायाभूत सुविधा देणे अत्यंत गरजेचे होते. एकीकडे तेलबिया व डाळीच्यां बाबतीत स्वयंपुर्णतेवर भर द्यायचा व परदेशातून तेलबिया व डाळी आयात करायचे यामुळे शेतक-यांचे सर्वाधिक नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी आजच्या अर्थसंकल्पावर व्यक्त केली. 

केंद्र सरकारने शेती क्षेत्रास भरीव तरतूद करणार असल्याचा डांगोरा पिटविला. मात्र, शेतक-यांच्या पदरात काहीच पडले नाही. मागील पाच वर्षातील केंद्र सरकारच्या शेतीच्या बजेटचा आढावा घेतला तर २०१९ साली ५.४४ टक्के असणारी तरतूद २०२४ साली ३.१५ टक्के इतकी खाली आलेली आहे. देशामध्ये ६० टक्के लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. दिवसेंदिवस शेतीचे बजेट मध्ये कपात करून शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष केले जात आहे. केंद्र सरकारने शेती क्षेत्रावरील खर्चाची श्वेतपत्रिका काढून शेतक-यांकडून होत असलेली खरेदी व शेती उत्पन्नातून व प्रक्रिया उद्योगातून किती जीएसटी मिळतो याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा, म्हणजे दुध का दुध व पाणी का पाणी समोर येईल. यामुळेच कृषीक्षेत्राचा दर ४.७ टक्क्यांवरून १.४ टक्क्यांनी घसरून ३.३ टक्यापर्यंत खाली येवू लागला आहे. ही बाब गंभीर असून यामुळेच शेतक-यांच्या आत्महत्या वाढू लागलेेत. 

केंद्र सरकार अर्थसंकल्पातील तरतुदी केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी आयात निर्यात- धोरण , पायाभूत सुविधा , शेतीमालावरील प्रक्रिया उद्योग याबाबतीत स्थिर धोरण ठेवले पाहिजे हे या सरकारकडून होत नसल्याचे स्पष्ट दिसून येवू लागले आहे. साखर, कांदा, तांदूळ, सोयाबीन, इथेनॅाल, दुध पावडर, डाळी, कापूस, यावरील आयात निर्यातीचे चुकीचे धोरण यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतक-यांना कोणत्याही मदतीची गरज नाही उलट बाजारात त्यांना विक्री व प्रक्रियेसाठी संधी उपलब्ध करून दिले पाहिजे. केंद्र सरकारकडून अनेक पिकासाठी हमीभावाची घोषणा केलेल्या आहेत. मात्र देशातील फक्त ६ टक्के शेतक-यांना हमीभाव मिळतो. उर्वरीत ९४ टक्के लोक हमीभावापासून वंचित आहेत. याकरिता सरकारने हमीभावाचा कायदा अंमलात आणला पाहिजे. जर केंद्र सरकारने अशाच पध्दतीने शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष केले, तर जवळपास १५० कोटी जनतेला दोन वेळ पुरेल एवढे अन्नधान्य पिकविणारा शेतकरी शेती क्षेत्रातून बाहेर पडू लागला तर या खंडप्राय देशामध्ये भुकबळी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

संबंधित लेख

इचलकरंजीत धारदार शस्त्राने वार करत पतीकडून पत्नीची हत्या...परिसरात खळबळ07 February 2025, 11:13:56 AM

शासनाने अधिकृत संशोधनावर आधारित परिपूर्ण शासकीय शिवचरित्र ग्रंथ प्रकाशीत करावा : संभाजीराजेंची मागणी06 February 2025, 05:58:25 PM

कोल्हापुरात बर्निंग कारचा थरार...05 February 2025, 06:08:55 PM

शिवप्रेमी आक्रमक ; अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शने... 05 February 2025, 03:26:06 PM

संत तुकाराम महाराजांच्या अकराव्या वंशजाने केली आर्थिक विवंचनेतून आत्महत्या05 February 2025, 03:12:29 PM

शिवनाकवाडी गावात तीनशे लोकांना महाप्रसादातून विषबाधा05 February 2025, 01:32:22 PM

राजारामपुरी पाचव्या गल्लीत चोरट्यांचा दोन लाख रोख रकमेवर डल्ला05 February 2025, 01:00:25 PM

राजारामपुरी पाचव्या गल्लीत चोरट्यांचा दोन लाख रोख रकमेवर डल्ला05 February 2025, 01:00:25 PM

माजी सभापती रामराजे निंबाळकर यांच्या चुलत भावाच्या घरावर आयकरचा छापा05 February 2025, 12:51:42 PM

विधानसभेच्या ७० जागांसाठी आज दिल्लीकर बजावतायत मतदानाचा हक्क...05 February 2025, 11:33:20 AM

अथर्व- दौलत साखर कारखान्याची सुमारे वीस कोटीची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा04 February 2025, 08:58:19 PM

दोडामार्ग तिलारी मार्ग दुरुस्तीसाठी बंद04 February 2025, 06:49:23 PM

१६ फेब्रुवारी ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जयसिंगपूरात 'नांगरट साहित्य सम्मेलन'04 February 2025, 06:24:14 PM

भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणूकीत राजर्षी शाहू शिक्षण सेवा आघाडीचे वर्चस्व 04 February 2025, 06:07:52 PM

आता तुमच्या वाचनाच्या आवडी आड येणार नाही... पुस्तकाची किंमत 04 February 2025, 05:44:24 PM

डॉ. संजय डी. पाटील यांचा राज्यपालांच्या हस्ते 'सी.एस.आर हिरो' पुरस्काराने गौरव04 February 2025, 05:39:53 PM

हातकणंगलेतील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील लाखो लिटर रसायनयुक्त पाणी थेट पंचगंगा नदीत 04 February 2025, 04:09:21 PM

अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रवासी आणि एसटी मध्ये दुवा म्हणून काम करतीय - प्रमोद तेलवेकर04 February 2025, 04:00:11 PM

महाकुंभात १०० कोटी लोकांच्या आगमनाची व्यवस्था, मग चेंगराचेंगरी कशी?-खासदार अखिलेश यादव04 February 2025, 02:51:12 PM

लवकरच एकसमान टोल धोरण येणार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 04 February 2025, 01:53:09 PM

शिंदे गटाच्या ‘या’ सामाजिक न्यायमंत्र्यांची ‘आमदारकी’ धोक्यात... 04 February 2025, 12:22:51 PM

कोल्हापुरातील टेंबलाईवाडी जवळ अपघात...महिला जागीच ठार 03 February 2025, 06:00:11 PM

कोल्हापुरातील मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 03 February 2025, 05:16:18 PM

कांडगावातील वळणावर खासगी आराम बस पलटी... पंचवीसहून अधिक प्रवासी जखमी 03 February 2025, 04:36:58 PM

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची मागणी करणारा फलक ठरतोय लक्षवेधी... 03 February 2025, 04:09:48 PM

...म्हणून मला टोकाचं पाऊल उचलावं लागलं : पैलवान शिवराज राक्षेचा खुलासा 03 February 2025, 01:22:16 PM

देशातील ‘या’ राज्यात लागू ‘सन्मानाने मरण्याचा अधिकार’03 February 2025, 12:56:27 PM

आता शिवसेनेचे मंत्री ऐकणार जनतेचे गाऱ्हाण...; जनता दरबार घेण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश 03 February 2025, 12:14:08 PM

टॅग्स

प्रशासकीय राजकीय धार्मिक कृषी क्राईम अपघात न्यायालय क्रीडा शैक्षणिक साहित्य मनोरंजन पर्यटन आरोग्य सहकार आंदोलन आरक्षण हवामान सामाजिक राज्य राष्ट्रीय इतर अर्थ उद्योग

व्हिडिओ

कृषी क्षेत्रात डिजीटल प्लॅट फार्मपेक्षा पायाभूत सुविधा देणे गरजेचे : राजू शेट्टी

23 July 2024, 09:08:38 PM Share
शिरोळ - केंद्र सरकारने आज जाहीर केलेला अर्थसंकल्प निराशाजनक आहे. कृषी क्षेत्रात डिजीटल प्लॅटफॅार्म करण्यापेक्षा पायाभूत सुविधा देणे अत्यंत गरजेचे होते. एकीकडे तेलबिया व डाळीच्यां बाबतीत स्वयंपुर्णतेवर भर द्यायचा व परदेशातून तेलबिया व डाळी आयात करायचे यामुळे शेतक-यांचे सर्वाधिक नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी आजच्या अर्थसंकल्पावर व्यक्त केली. 

केंद्र सरकारने शेती क्षेत्रास भरीव तरतूद करणार असल्याचा डांगोरा पिटविला. मात्र, शेतक-यांच्या पदरात काहीच पडले नाही. मागील पाच वर्षातील केंद्र सरकारच्या शेतीच्या बजेटचा आढावा घेतला तर २०१९ साली ५.४४ टक्के असणारी तरतूद २०२४ साली ३.१५ टक्के इतकी खाली आलेली आहे. देशामध्ये ६० टक्के लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. दिवसेंदिवस शेतीचे बजेट मध्ये कपात करून शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष केले जात आहे. केंद्र सरकारने शेती क्षेत्रावरील खर्चाची श्वेतपत्रिका काढून शेतक-यांकडून होत असलेली खरेदी व शेती उत्पन्नातून व प्रक्रिया उद्योगातून किती जीएसटी मिळतो याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा, म्हणजे दुध का दुध व पाणी का पाणी समोर येईल. यामुळेच कृषीक्षेत्राचा दर ४.७ टक्क्यांवरून १.४ टक्क्यांनी घसरून ३.३ टक्यापर्यंत खाली येवू लागला आहे. ही बाब गंभीर असून यामुळेच शेतक-यांच्या आत्महत्या वाढू लागलेेत. 

केंद्र सरकार अर्थसंकल्पातील तरतुदी केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी आयात निर्यात- धोरण , पायाभूत सुविधा , शेतीमालावरील प्रक्रिया उद्योग याबाबतीत स्थिर धोरण ठेवले पाहिजे हे या सरकारकडून होत नसल्याचे स्पष्ट दिसून येवू लागले आहे. साखर, कांदा, तांदूळ, सोयाबीन, इथेनॅाल, दुध पावडर, डाळी, कापूस, यावरील आयात निर्यातीचे चुकीचे धोरण यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतक-यांना कोणत्याही मदतीची गरज नाही उलट बाजारात त्यांना विक्री व प्रक्रियेसाठी संधी उपलब्ध करून दिले पाहिजे. केंद्र सरकारकडून अनेक पिकासाठी हमीभावाची घोषणा केलेल्या आहेत. मात्र देशातील फक्त ६ टक्के शेतक-यांना हमीभाव मिळतो. उर्वरीत ९४ टक्के लोक हमीभावापासून वंचित आहेत. याकरिता सरकारने हमीभावाचा कायदा अंमलात आणला पाहिजे. जर केंद्र सरकारने अशाच पध्दतीने शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष केले, तर जवळपास १५० कोटी जनतेला दोन वेळ पुरेल एवढे अन्नधान्य पिकविणारा शेतकरी शेती क्षेत्रातून बाहेर पडू लागला तर या खंडप्राय देशामध्ये भुकबळी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

संबंधित लेख

इचलकरंजीत धारदार शस्त्राने वार करत पतीकडून पत्नीची हत्या...परिसरात खळबळ

शासनाने अधिकृत संशोधनावर आधारित परिपूर्ण शासकीय शिवचरित्र ग्रंथ प्रकाशीत करावा : संभाजीराजेंची मागणी

कोल्हापुरात बर्निंग कारचा थरार...

शिवप्रेमी आक्रमक ; अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शने...

संत तुकाराम महाराजांच्या अकराव्या वंशजाने केली आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

शिवनाकवाडी गावात तीनशे लोकांना महाप्रसादातून विषबाधा

राजारामपुरी पाचव्या गल्लीत चोरट्यांचा दोन लाख रोख रकमेवर डल्ला

राजारामपुरी पाचव्या गल्लीत चोरट्यांचा दोन लाख रोख रकमेवर डल्ला

माजी सभापती रामराजे निंबाळकर यांच्या चुलत भावाच्या घरावर आयकरचा छापा

विधानसभेच्या ७० जागांसाठी आज दिल्लीकर बजावतायत मतदानाचा हक्क...

अथर्व- दौलत साखर कारखान्याची सुमारे वीस कोटीची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

दोडामार्ग तिलारी मार्ग दुरुस्तीसाठी बंद

१६ फेब्रुवारी ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जयसिंगपूरात 'नांगरट साहित्य सम्मेलन'

भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणूकीत राजर्षी शाहू शिक्षण सेवा आघाडीचे वर्चस्व

आता तुमच्या वाचनाच्या आवडी आड येणार नाही... पुस्तकाची किंमत

डॉ. संजय डी. पाटील यांचा राज्यपालांच्या हस्ते 'सी.एस.आर हिरो' पुरस्काराने गौरव

हातकणंगलेतील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील लाखो लिटर रसायनयुक्त पाणी थेट पंचगंगा नदीत

अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रवासी आणि एसटी मध्ये दुवा म्हणून काम करतीय - प्रमोद तेलवेकर

महाकुंभात १०० कोटी लोकांच्या आगमनाची व्यवस्था, मग चेंगराचेंगरी कशी?-खासदार अखिलेश यादव

लवकरच एकसमान टोल धोरण येणार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

शिंदे गटाच्या ‘या’ सामाजिक न्यायमंत्र्यांची ‘आमदारकी’ धोक्यात...

कोल्हापुरातील टेंबलाईवाडी जवळ अपघात...महिला जागीच ठार

कोल्हापुरातील मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कांडगावातील वळणावर खासगी आराम बस पलटी... पंचवीसहून अधिक प्रवासी जखमी

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची मागणी करणारा फलक ठरतोय लक्षवेधी...

...म्हणून मला टोकाचं पाऊल उचलावं लागलं : पैलवान शिवराज राक्षेचा खुलासा

देशातील ‘या’ राज्यात लागू ‘सन्मानाने मरण्याचा अधिकार’

आता शिवसेनेचे मंत्री ऐकणार जनतेचे गाऱ्हाण...; जनता दरबार घेण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश

टॅग्स

प्रशासकीय राजकीय धार्मिक कृषी क्राईम अपघात न्यायालय क्रीडा शैक्षणिक साहित्य मनोरंजन पर्यटन आरोग्य सहकार आंदोलन आरक्षण हवामान सामाजिक राज्य राष्ट्रीय इतर अर्थ उद्योग

व्हिडिओ