तोडकर संजीवनी चषक फुटबॉल स्पर्धेत 'या 'संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

05 May 2025, 07:26:25 PM Share
फुलेवाडी स्पोर्टस इन्स्टिट्यूट आयोजित तोडकर संजीवनी चषक फुटबॉल स्पर्धेत आज दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रिडा मंडळ यांच्यात सामना खेळवण्यात आला. पूर्वाधात दोन्ही गोल क्षेत्रात चेंडू फिरता राहिला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. उत्तरार्धात दिलबहारच्या स्वयंम साळोखे, अजिज मोमीन, सुशांत अतिग्रे, शुभम माळी, गंधर्व घाटगे तर फुलेवाडीच्या प्रतिक सावंत, अक्षय मंडलिक, प्रविण साळोखे, सत्यम पाटील , विराज साळोखे या खेळाडूंनी गोल जाळीपर्यंत चेंडू नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना गोल नोंदवता आला नाही. संपूर्ण वेळेत सामना गोल शुन्य राहिल्यानं निकालासाठी पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. यात फुलेवाडी संघानं ५ विरुद्ध ४ गोलनी दिलबहार संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. फुलेवाडीचा अजय जाधव हा सामनावीर ठरला. उद्या खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध सम्राट नगर स्पोर्टस यांच्यात सामना दुपारी चार वाजता खेळवला जाणाराय.

संबंधित लेख