‘इंडियन आयडॉल’ चा विजेता अपघातात जखमी
05 May 2025, 05:21:38 PM
Share
मुंबई - ‘इंडियन आयडॉल’मधून प्रसिद्धीझोतात आलेला गायक पवनदीप राजनचा आज सोमवारी पहाटे ३:४० च्या दरम्यान कार अपघात झाला आहे. अपघातात तो गंभीर जखमी झाल्याचं व्हायरल व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. अहमदाबाद येथे हा अपघात झाला असून पवनदीपच्या डाव्या पायाला आणि उजव्या हाताला दुखापत झाल्याचं दिसून येते. अद्याप याबद्दलची सविस्तर माहिती समोर आली नाही.
पवनदीप राजन ‘इंडियन आयडॉल’ सिजन १२ चा विजेता ठरला होता. ट्रॉफी जिंकल्यानंतर पवनदीपला २५ लाखांचं मानधन व एक चारचाकी गाडी बक्षीस स्वरूपात मिळाली होती. पवनदीपसह अरुणिता कांजीलाल ही पहिल्या क्रमांकाची, तर सायली कांबळे दुसऱ्या क्रमांकाची दावेदार ठरली होती. देशभरात पवनच्या गाण्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. तर पवनदीपने महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पांघरुण’ या चित्रपटासाठी ‘सतरंगी झाले रे’ हे गाणं सुरबद्ध केलं होतं.