स्केटिंगपटू अधिराज अथणे याचा स्केटिंग करत १०३ मिनिटे लाठी फिरविण्याचा उद्या विक्रम

05 May 2025, 04:26:14 PM Share
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०३ व्या स्मृतिदिना निमित्त कोल्हापुरातील १२ वर्षीय स्केटिंगपटू अधिराज अथणे हा सलग १०३ मिनिटे स्केटिंग करत लाठी फिरवण्याचा विक्रम करणार आहे. मंगळवारी ६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता प्रतिभानगर येथील वि. स. खांडेकर शाळा परिसरातील एस. के. रोलर स्केटिंग अॅकॅडमीच्या रिंगवर हा विक्रम होणार आहे. अधिराज अथणे याच्या विक्रमावेळी स्केटिंग क्रीडाप्रेमी व शाहूप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्केटिंग प्रशिक्षक सुहास कारेकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

संबंधित लेख