मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या कन्येचे 12 वीत घवघवीत यश

05 May 2025, 02:28:00 PM Share
बीड - मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात हादरला होता. या घटनेमुळे देशमुख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता.  संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून त्यांची कन्या वैभवी हिने चुलते धनंजय देशमुखांसोबत राज्यभर दौरा करून आंदोलनात सहभाग घेतला. वैभवीचे हे बारावीचे वर्ष होते. डोक्यावर दु:खाचा डोंगर असताना देखील वैभवी हिने 12 वीची परीक्षा दिली. या कठीण परिस्थितीमध्येही बारावीच्या परीक्षेत वैभवीने घवघवीत यश मिळवले. तिला 85.33 टक्के गुण मिळाले आहेत.

संबंधित लेख