इचलकरंजीत मनसेची संघटनात्मक बैठक ;  पक्षवाढीसाठी पदाधिकाऱ्यांना सक्रिय राहण्याचे आवाहन

<p>इचलकरंजीत मनसेची संघटनात्मक बैठक ;  पक्षवाढीसाठी पदाधिकाऱ्यांना सक्रिय राहण्याचे आवाहन</p>

इचलकरंजी - शहरात मनसेची संघटनात्मक बैठक आयोजित करण्यात आली होती. कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख यशवंत किल्लेदार आणि नंदकुमार चिले यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले. या बैठकीत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करावे, ज्या ठिकाणी पक्षाची पदे रिक्त आहेत ती तातडीने भरावीत, संघटनात्मक शिस्त पाळावी आणि प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षवाढीसाठी सक्रिय रहावे, अशा सूचना यशवंत किल्लेदार आणि नंदकुमार चिले यांनी दिल्या.

या बैठकीला जिल्हा अध्यक्ष दौलतराव पाटील, राजु दिंडोर्ले, इचलकरंजी शहर अध्यक्ष रवी गोंदकर, जिल्हा सचिव प्रतापराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, वैभव भोसले, कुमार पुदाले, लखन लादे, बाळासाहेब कदम, रसिका साळुंखे, विनायक मुसळे यांच्यासह तालुक्यातील आणि शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.