जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार प्रसार समितीत अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या समावेशाची मागणी

<p>जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार प्रसार समितीत अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या समावेशाची मागणी</p>

कोल्हापूर -  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने मागील ३६ वर्ष समाजातील शोषण, फसवणूक, भोंदूगिरी, दिशाभूल घडवणाऱ्या अंधश्रद्धे विरुद्ध सातत्याने काम करत आहे. संघटना विज्ञाननिष्ठ समाज निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. संघटनेने जादूटोणा आणि बुवाबाची विरुद्ध कायदा करण्याची मागणी १९९५ पासून लावून धरली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने २६ डिसेंबर २०१३ रोजी जादूटोणाविरुद्ध कायदा मंजूर केला. त्यामुळे सध्या समाज कल्याण विभागाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार प्रसार समितीमध्ये संघटनेतील कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉक्टर बी एम हिडेकर, उपाध्यक्ष डॉक्टर प्रवीण चौगुले, राज्य कार्यवाह सीमा पाटील, रेश्मा खाडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद शिंदे, रामदास देसाई, महेश ओलेकर आदी उपस्थित होते.