शिरोली दुमाला परिसरात गव्यांचा वावर..
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
कोल्हापूर - आज करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला गावात गव्याचा कळप आढळून आला आहे. गवे आल्याच्या माहितीने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. यावेळी लोकनियुक्त सरपंच सचिन विश्वास पाटील यांनी घटनास्थळी भेट देत वनविभागाशी संपर्क साधला. वन्यप्राण्यांच्या नागरी वस्तीतील वावराच्या घटना वाढू लागल्या असून वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.