काँग्रेस कमिटीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
कोल्हापूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीमध्ये शहराध्यक्ष सचिन चव्हाण आणि भारती पोवार यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी उपमहापौर विक्रम जरग,कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यालयीन सचिव संजय पोवार वाईकर, कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यालयीन सचिव रोहित पाटील, संपत पाटील, रंगराव देवणे, प्रदीप शेलार, संदीप गदगडे, संजय पटकारे, सलीम मुल्ला, उज्वला चौगुले,अलका सनगर, पूजा आरडे ,डी.एस. शिलेदार,डॉ.प्रमोद बुलबुले, कौसर बशीर पटेकर, अथर्व चौगुले, बाबुराव कांबळे, युवराज पाटील , विजयानंद पोळ यासह कार्यकर्ते उपस्थित होते.