ख्रिस्ती दफनभूमीसाठी जागा निश्चित करा : आपची मागणी  

<p>ख्रिस्ती दफनभूमीसाठी जागा निश्चित करा : आपची मागणी  </p>

कोल्हापूर - शहरातील ख्रिस्ती समाजाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भविष्यात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने दफनभूमीसाठी योग्य व वैज्ञानिक नियोजन करणे गरजेचे आहे. सध्या कदमवाडी येथील ख्रिस्ती दफनभूमी पूर्ण भरलेली आहे. त्यासाठी योग्य, प्रवेश सुलभ व नगररचना निकषांना पूरक अशी स्वतंत्र जागा विकास योजनेत निश्चित करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने  नगर रचना उपसंचालक दिलीप कदम यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, वायल्डर मेमोरियल चर्चचे सचिव संदीप थोरात, आशुतोष बेडेकर, मनीषा गायकवाड, सचिन मालप आदी उपस्थित होते.