केंद्राने इंडिगोवर अॅक्शन घेतली पाहिजे...
खा. सुप्रिया सुळे संतापल्या
मुंबई – गेल्या दोन – तीन दिवसापासून इंडिगो एअरलाईनकडून प्रवाशांना व्यवस्थित सेवा दिली जात नाही. तसेच असंख्य विमानांचे उड्डाणे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर खा. सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त करत संतापल्या आहेत.
केंद्र सरकारने इंडिगोवर अॅक्शन घेतली पाहिजे. सध्या इंडिगोच्या प्रवाशांना ज्या काही अडचणी येत आहेत, त्यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्कळीतपणा नेमकं कसा झाला? आधी कोणतीही सूचना न देता हा विस्कळीतपणा सुरू आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये आणि वेळ देखील वाया जात आहे. आम्हाला इंडिगोकडून अशा प्रकारची अपेक्षा नव्हती. पण आता केंद्र सरकारने इंडिगोसारख्या आणखी पाच कंपन्या तयार केल्या पाहिजेत. तसेच इंडिगोच्या सेवेला काय अडचणी आल्या आहेत? इंडिगोची सेवा अचानक विस्कळीत का झाली? त्यावर उपाय काय? याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली पाहिजे”, असं खा. सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.