डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम 50 टक्के पूर्ण
मुंबई – पुढच्या वर्षभरात इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्याचा आमचा मानस आहे. सध्या स्मारकाचे 50 टक्के काम पूर्ण झाले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.
कालपासून मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे. येत्या पावसाळ्यापर्यंत पुतळ्याचा ढाचा उभारण्याचे नियोजन आहे. यानंतर पुतळ्याच्या उभारणीत अडचणी न उद्भवल्यास पुढच्या महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे लोकार्पण होऊ शकणार आहे, असे स्मारक समितीकडून सांगण्यात आले आहे.