कागल आगारात नव्याने राजमाता जिजाऊ बसेस दाखल...

<p>कागल आगारात नव्याने राजमाता जिजाऊ बसेस दाखल...</p>

कोल्हापूर -  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कागल आगारात नव्याने दोन अत्याधुनिक 'राजमाता जिजाऊ' बसेस दाखल झाल्या. या बसमध्ये ५६ आसन क्षमता असून सीसीटीव्ही कॅमेरा सुविधा, आरामदायी आसन व्यवस्था आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या बसेसचे पूजन करण्यात आले. आधुनिक सुविधांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि आरामदायी होणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

या प्रसंगी जिल्हा बँकेचे भैय्या माने, माजी नगराध्यक्ष अस्लम मुजावर, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, नवाज मुश्रीफ, आगार प्रमुख संदीप पाटील, मारुती जोशी, अरुण लाड, संजय सनगर, श्रीमंत घोरपडे, सुभाष पोवार आदि उपस्थित होते.