इचलकरंजीत फिल्टर केलेले शुद्ध पाणी थेट गटारीत आणि घरात घुसत असल्याचा धक्कादायक प्रकार

<p>इचलकरंजीत फिल्टर केलेले शुद्ध पाणी थेट गटारीत आणि घरात घुसत असल्याचा धक्कादायक प्रकार</p>

इचलकरंजी - शहरातील महेश कॉलनी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून फिल्टर हाऊसमधील पाणी नाल्याद्वारे सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हे पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात वाहत आहे की परिसरातील अनेक घरांच्या भिंती ओलाव्यामुळे कमजोर झाल्या आहेत. काही घरांच्या भिंतींना तडेही गेले आहेत एका बाजूला नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करावे लागत असताना दुसऱ्या बाजूला लाखो लिटर फिल्टर केलेले पाणी वाया जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

वारंवार तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. उपमहापौर अनिल डाळ्या हे याच प्रभागातले असून त्यांच्याकडे नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी केल्या. त्यांनी येत्या आठ दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या समस्येमुळे त्रस्त नागरिक आता आंदोलनाच्या तयारीत असून घरात घुसणाऱ्या पाण्यापासून आम्हाला मुक्तता कधी मिळणार? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.